Titwala Viral Video SaamTvNews
मुंबई/पुणे

Titwala Viral Video : टिटवाळ्यात तरुणांमध्ये जीवघेणी मारहाण; एकाच्या डोक्यात घातला दगड!

तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना टिटवाळा जवळील खडवली परिसरात घडली आहे.

प्रदीप भणगे

टिटवाळा : किरकोळ कारणावरुन काही तरुणांमध्ये हाणामारी झाली असून यात एका तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना टिटवाळा (Titwala) जवळील खडवली परिसरात घडली आहे. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेची टिटवाळा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Titwala Viral Video Latest News)

गेल्या दोन दिवसात टिटवाळा, कल्याण (Kalyan) आणि आजूबाजूच्या परिसरात सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये (Video) काही तरुण आपापसात भांडत होते. भांडणादरम्यान एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला खाली पाडले व दुसऱ्या तरुणाने या तरुणाच्या डोक्यात दगड घातला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार आली नव्हती.

मात्र, सोशल मीडियावर (Social Media) व्हिडिओ व्हायरल झाल्याने या व्हिडिओच्या आधारे टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला. सदर घटना खडवली नदीच्या परिसरात घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, हे तरुण कोण आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. या घटनेत जखमी तरुण उमेश पाटील हा भिवंडी येथे राहणारा आहे.

तो खडवली नदी परिसरात आपला काही मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. या तरुणांनी उमेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर एका तरुणाने त्याच्या डोक्यात दगड घातला. उमेश पाटील याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, आज खरेदीचा 'गोल्डन चान्स'; 18K, 22K आणि 24K चे दर किती?

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Solapur : नवऱ्याने बायकोला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, एकांतात बोलायचे सांगून खोलीत नेलं, नंतर...

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ कसं जायचं? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT