Kalyan Titwala Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : टिटवळ्यात विचित्र अपघात! भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना दिली धडक

Kalyan Titwala Accident News : टिटवाळा परिसरात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या कंटेनरने १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • टिटवाळ्यात भरधाव कंटेनरची १० ते १५ वाहनांना धडक

  • चुकीच्या दिशेने येत असल्याचा आरोप

  • मोठी जीवितहानी टळली

  • नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण जवळील टिटवाळा परिसरात आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने तब्बल दहा ते पंधरा वाहनांना जोरदार धडक दिल्याने एकच खळबळ उडाली. दैव बलवत्तर म्हणून मोठी जीवित हानी टळली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर गाड्यांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी अपघातानंतर कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चुकीच्या दिशेने येत असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांना त्याची धडक बसली. काही क्षणांतच अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाला घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.

या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच घटनास्थळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून कंटेनर चालकाविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT