TIGER SHROFF FIRING CASE saam tv
मुंबई/पुणे

घोडा अडकला, टायगर वाचला; आरोपींचं फूलप्रुफ प्लॅनिंग, पोलिसही चक्रावले

Tiger Shroff Firing Incident: टायगर श्रॉफवर तीन आरोपींनी बेछुट गोळीबार केला..मात्र शुटरचा घोडा अडकल्यानं टायगर कसा वाचला? 15 तासांत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या? पाहूयात A TO Z स्टोरी... या स्पेशल रिपोर्टमधून....

Suprim Maskar

जुहू परिसरात दिवसाढवळ्या एक दोन नव्हे तर तब्बल 5 गोळ्या टायगर श्रॉफच्या गाडीवर झाडण्यात आल्या...आरोपींनी ज्या बाजूनं फायरिंग केली त्याच बाजूला टायगरही ड्रायव्हरशेजारी बसला होता...अगदीजवळून गोळ्या झाडूनही टायगर वाचला तो एका हल्लेखोराची बंदुक जाम झाल्यानं आणि या हल्ल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत 15 तासांत आरोपींला ताब्यात घेतलं...

18 ऑक्टोबर 2026

संध्या 6.45

पहिल्यांदा वाचला-

फुटबॉल मैदानातूनच आधी टायगरनं सर्व चाहत्यांना हात केला

टायगर थेट गेटबाहेर आला असता तर हल्लेखोरांनी थेट गोळ्या झाडल्या असत्या..

संध्या 6.55 वा.

फुटबॉल खेळून टायगर श्रॉफ BMW कारमधून मैदानाच्या बाहेर पडला

चाहत्यांनी टायगरसोबत फोटो काढण्यासाठी मैदानाजवळच गर्दी केली

संध्या 7.05 वा.

टायगर श्रॉफच्या गाडीवर तीन हल्लेखोरांनी गोळीबार सुरु केला

दुसऱ्यांदा वाचला-

एका हल्लेखोराची बंदुक जाम झाल्यानं गोळ्या झाडता आल्या नाही. त्यामुळे टायगर दुसऱ्यांदा बचावला

दुसरा हल्लेखोर गोळ्या झाडतच होता, पण गोळीबार झाल्याचं लक्षात येताच टायगर गाडीतच खाली झुकला

तिसऱ्यांदा वाचला-

खाली झुकल्यानं गोळ्या गाडीच्या काचेवर आणि बोनेटवर लागल्या त्यामुळे टायगरला एकही गोळी थेट लागली नाही

संध्या 7.08 वा.

लागोपाठ 5 गोळ्या झाडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले

संध्या 7.10 वा.

गोळीबारात ड्रायव्हर जखमी झाल्यानं टायगरनं स्वत: हॉस्पिटलच्या दिशेने गाडी नेली

गोळीबारात टायगरचा चाहताही जखमी झाल्यानं लोकांनी त्यालाही हॉस्पिटलला नेले

संध्या 7.15 वा.

पोलिस स्टेशन जवळ असल्यानं पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले

संध्या 7.30 वा.

दुचाकीवरून आरोपी अंधेरी रेल्वे स्टेशनवर आले त्यांनी बोरिवलीकडे जाणारी ट्रेन पकडली.. CCTV फुटेजमधून ही माहिती समोर आली..

संध्या 8.00 वा.

लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनं टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली

अनिल पंडित या आरोपीनं यासंदर्भातली ऑडिओ

क्लिपही जारी केली..

संध्या 9.00 वा.

आरोपींनी बोरिवलीतून पुणे-जयपूर एक्सप्रेस पकडली

हल्लेखोर दिल्लीला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानं कोट्यातच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला

संध्या 10.00 वा.

मुंबई पोलिस, अँटी-गँगस्टर टास्क फोर्स, कोटा शहर पोलीसांनी संयुक्त कारवाई केली

19 ऑक्टोबर 2026

सकाळी 7.45 वा.

फूल सिह, रुतिक कुमार आणि रेहान या आरोपींना पोलिसांनी कोटा रेल्वे स्थानकातून अटक केली

यातला एक आरोपी महाराष्ट्रातला तर इतर दोघे हरियाणातले आहे...

हे तीनही आरोपी गेल्या २० दिवसांपासून मुंबईतच राहात असल्याचं चौकशीतून समोर आलं .

एवढंच नव्हे तर गेल्या 5 दिवसात त्यांनी 2 वेळा टायगर श्रॉफच्या घराची आणि जुहूत तो खेळायला जात असलेल्या फुटबॉल मैदानाची रेकी केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.बॉलिवूड कलाकारावरचा हा काही पहिला हल्ला नाही..अशा हल्ल्यानंतर सुरक्षा जरी वाढवली जात असली तरी हे हल्ले रोखण्यात मुंबई पोलिसांना अपयश येत आहे. आता हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे जबाबदारी घेणाऱ्या बिश्णोई गॅंगच्या अनिल पंडितला पोलिस बेड्या कधी ठोकतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे टायगरला भेटले 'राम'ला का नाही? प्रदिप पूर्णेकरांच्या मुलाचा शिंदेंना थेट सवाल

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; बॉलीवूड भीतीच्या छायेत

Gokul Election Result: गोकुळच्या निवडणुकीत महाडिक कुटुंबाला धक्का! शौमिका महाडिकांचा दारूण पराभव

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घ्यावे लागणार? ९२ हजार अपात्र लाभार्थ्यांमुळे खळबळ

MLC Election: पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी कधी होणार मतदान, ५ जागांसाठी किती उमेदवार रिंगणात? जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी

SCROLL FOR NEXT