TIGER SHROFF FIRING CASE saam tv
मुंबई/पुणे

10 दिवस आधी मुंबईत, ४५ मिनिटं जुहूत मैदानाबाहेर दबा धरून...असा रचला होता टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट

Tiger Shroff Firing Case Latest Update And Three Accused Arrested: अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा येथे अटक केली. आरोपींनी टायगरच्या दिनक्रमावर नजर ठेवली होती.

Omkar Sonawane

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी या हल्ल्याचा संपूर्ण कट रचला होता. यासाठी त्यांनी टायगर श्रॉफच्या दिनचर्येवर लक्ष ठेवले होते. टायगर दर रविवारी जुहू येथील फुटबॉल मैदानावर खेळण्यासाठी जातो, याची माहिती आरोपींना होती. टायगरवर हल्ला करण्याआधी हे आरोपी ४५ मिनिटे आधीच मैदानाबाहेर पोहोचले होते. टायगर मैदानाबाहेर येण्याची वाट पाहत आरोपी दबा धरून बसले होते.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा घटनाक्रम

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६

दुपारी ३ वाजेच्या सुमारास : टायगर श्रॉफ आपल्या नेहमीच्या दिनक्रमानुसार मुंबईतील जुहू येथील जमनाबाई नरसी ग्राउंडवरील फुटबॉल टर्फवर पोहोचला.

संध्याकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान : टायगर श्रॉफने फुटबॉल खेळला आणि चाहत्यांशी संवाद साधला. या संवादाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास : जुहूतील पुष्पा पार्कजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. गोळीबारानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले. जखमी ड्रायव्हरला घेऊन टायगर श्रॉफ नानावटी रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्याचे दिसून आले.

रात्री ८ वाजेच्या सुमारास : जुहू परिसरातून पळून गेल्यानंतर हल्लेखोर अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकावर पोहोचल्याची माहिती आहे.

रात्री १० वाजता : मुंबईतून पळून जाण्यासाठी आरोपींनी वसई रेल्वे स्थानकातून पुणे-जयपूर एक्स्प्रेस पकडली.

रात्री ११ वाजता : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी टायगर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि घटनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६

पहाटे ४ वाजताच्या सुमारास : मुंबई पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्रास्त्र कायद्यातील संबंधित कलमांनुसार एफआयआर दाखल केला.

१८ ऑक्टोबरच्या रात्रीपासून १९ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत : मुंबई पोलिसांनी रात्रभर तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मार्गाचा माग काढण्यात आला.

सकाळी १० वाजता : पोलीस पथकांनी आरोपींच्या हालचालींचा माग काढत ते राजस्थानच्या दिशेने जात असल्याचे शोधून काढले.

सकाळी ११ वाजता : राजस्थानमधील कोटा येथे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आणि अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT