mumbai Crime news Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत चाललंय काय? दिवसाढवळ्या घरात घुसून महिलेची हत्या, परिसरात खळबळ

Mumbai Crime News: चोरीच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Mumbai Crime News: मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील ताडदेव परिसरात ७० वर्षीय महिलेच्या हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ताडदेव परिसरात ७० वर्षीय महिलेची चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवसाढवळ्या चोरट्यांनी महिलेची घरात शिरून हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरेखा मदन अग्रवाल असे मृत महिलेचे नाव आहे.

चोरट्यांकडून महिलेची हत्या

मुंबईतील ताडदेव परिसरात ७० वर्षीय सुरेखा मदन अग्रवाल यांच्या घरात तीन अनोळखी व्यक्ती शिरले. सकाळी घरात घुसलेल्या या दरोडेखोरांनी या वृद्ध जोडप्याचे हात पाय बांधले. त्यानंतर या दरोडोखोरांनी महिलेच्या अंगावरील दागिने चोरण्यासाठी त्यांचे तोंड बांधले. त्यानंतर दरोडोखोरांनी सोन्याचे दागिने चोरल्यानंतर घरातून पोबारा केला.

मात्र, दरोडेखोरांनी महिलेचं तोंड बांधल्याने गुदमुरून मृत्यू झाला आहे. चोरी उद्देशाने तीन अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून चोरी केली आहे. अग्रवाल नावाचं कुटुंब एकटं राहत असल्यामुळे दरोडेखोरांनी गैरफायदा उचलला. या घटनेनंतर ताडेदव पोलीस घटनास्थळी दाखल झाले .

नेमकं काय घडलं?

अग्रवाल जोडपं मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी चार ते पाच घरात घुसून मदन यांना घरात ढकलले. या चोरट्यांनी जोडप्याचे हात पाय दोरीने बांधले. त्यांनी त्यानंतर आरडाओरड सुरू केली. त्यानंतर दोघ्यांच्या तोंडात कापसाचा गोळा घातला. त्यानंतर चिकपट्टीने त्यांचं तोंड बंद केलं. त्यानंतर चोरट्यांनी दागिने आणि इतर मौल्यवान घेऊन लंपास झाले.

ताडदेव येथील युसुफ मंजिल या इमारतीत हा सगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची ताडदेव पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT