Drugs Suppliers Arrested In Dombivali प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह रिक्षाचालकांना गांजा पुरवणारे तिघेजण गजाआड

धुळ्यातील (Dhule) आदिवासी भागातून विक्री होणारा गांजा खरेदी करून तो विकणाऱ्या टोळीचा डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला आहे.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली : धुळ्यातील (Dhule) आदिवासी भागातून विक्री होणारा गांजा खरेदी करून तो विकणाऱ्या टोळीचा डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला आहे. या टोळीमधील डोंबिवलीत (Dombivali) राहणाऱ्या आनंद शंकर देवकर या आरोपी कडून 3 लाख 10 हजार 500 रुपयाचा माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा इसम कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आणि रिक्षा वाल्याना गांजा (Drugs) पुरवत होता. (Dombivali News In Marathi)

सापळा रचून अटक;

मानपाडा पोलिसांना एक इसम अंमली पदार्थ घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हॉटेल शिवमच्या बाजूस पोलिसांनी सापळा रचल्यानंतर एक इसम मोकळ्या मैदानात दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेतले असता 20 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. (Drugs Suppliers Arrested In Dombivali)

हे देखील पहा-

आदिवासी भागातून गांजाची विक्री;

त्यानंतर तपास केल्यावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आदिवासी भागातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असून पोलिसांनी या प्रकरणी शिवमंदिर जवळ रामनगर रोड येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर, शिरपूर येथे राहणारा रेहमल पावरा, संदीप पावरा , यांना अटक केली असून यातील मुख्य आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवली परिसरात अनेक ठिकाणी चरस आणि गांजा राजरोस विकला जात आहे. त्यामुळे पोलिस याकडे लक्ष देतील का हे पाहावे लागेल. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT