Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस वेवर भीषण पघात, तीनजण गंभीर जखमी

कार चालकाचे नियंत्रित सुटले आणि कार थेट दुभाजक तोडून पुलाच्या पलिकडून जाणार्‍या दुसऱ्या कारला धडकली.

जयश्री मोरे

Mumbai Accident News : मुंबईच्या (Mumbai) ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी भीषण अपघात झाला. रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Mumbai Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, एक कार मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जात होती, तर दुसरीकडे ठाण्याकडून एक कार मुंबईच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान त्याच मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जात असलेल्या कार चालकाचे नियंत्रित सुटले आणि कार थेट दुभाजक तोडून पुलाच्या पलिकडून जाणार्‍या दुसऱ्या कारला धडकली. या घटनेमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्या आणि काही तासांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्व वाहनांसाठी मोकळा करण्यात आला.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांच्या मदतीने तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या जवळच असलेल्या गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या विक्रोळी पोलीस अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT