ambethan, pimpri chinchwad, childrens, farm, police saam tv
मुंबई/पुणे

हदयद्रावक ! शेतातील खड्ड्यात पडून एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू

या घटनेमुळं परिसरात शाेककळा पसरली आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड़ : आंबेठान (ambethan) येथील एका शेतामधील (farm) खड्ड्यात तीन मुलांचा (childrens) पडून मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) घडली आहे. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबियांना (family) माेठा धक्का बसला आहे. ही घटना महाळूंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत. (pimpri chinchwad marathi news)

घटनास्थळावरुन तसेच पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार हे आंबेठाण येथे नामदेव भिकाजी लांडगे यांच्या मालकीचे शेत आहे. त्यानजीक भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांचे घर आहे. तेथे किशाे जाेगेश्वर दास हे वास्तव्यास आहेत.

दास यांची मुलांचा शेतामधील खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये राकेश किशोर दास(वय 5) , रोहित किशोर दास (वय 8) तसेच श्वेता किशोर दास (वय 4) यांचा समावेश आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांन हळहळ व्यक्त करीत आहेत.

पोलिस उपआयुक्त मंचक ईप्पर यांनी या घटनेविषयी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले घराच्या बाजुला असलेल्या शेतात तयार केलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. या खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने बहिण भावंडे पाण्यात बुडाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितलं.

ह्या दुर्दैवी घटनेतील तिन्ही मुलांचे वडील किशोर जोगेस्वर दास हे कामगार आहेत. ते आंबेठान येथे भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. तसेच नामदेव भिकाजी लांडगे यांच्या शेतातील खड्ड्यात बुडून किशोर दास यांच्या तिन्ही मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

Good News : मुंबई-पुण्यात १० नवी मेट्रो सुरू होणार, नावे आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

Google Pay, PhonePe, Paytm युजर्सला धक्का! आता UPI पेमेंटवर द्यावा लागणार चार्ज? संसदेत बिल सादर

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

SCROLL FOR NEXT