Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; NIAच्या ई-मेलवर धमकीचा मेल

देशातील प्रमुख शहरांना सतर्ककेचा इशारा देण्यात आला आहे.

सुरज सावंत

Mumbai News : मुंबईला पुन्हा दहशदवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. NIA या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ईमेल आयडीवर हा मेल आला असून त्यानंतर देशातील प्रमुख शहरांना सतर्ककेचा इशारा देण्यात आला आहे.

NIA कडून मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षालाही गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास हा मेल पाठवण्यात आला असून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेल करणाऱ्याने आपण तालिबानी असून तालिबाणी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशावर चालत असल्याचा उल्लेख केला आहे.

या मेलनंतर संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली असून हा मेल कुठून व कुणी केला हा खोडसाळ प्रकार तर नाहीना याचाही पोलीस शोध घेत आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानक यासह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. याआधी मागील महिन्यातही एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, प्रति तोळा १ लाख २४ हजारांच्या पार; आज किती रूपयांनी महागले गोल्ड?

Pimpri Chinchwad Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पिंपरी चिंचवड पोलीस; ४४ लाख रुपयाची मदत

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! 'त्या' GR ला स्थगिती देण्यास नकार, कोर्टात नेमकं काय घडलं?

Virar News: माझ्या आईला न्याय द्या! चिमुरडीचं हृदयस्पर्शी आंदोलन|VIDEO

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात मोठी बातमी, GR ला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

SCROLL FOR NEXT