Mumbai Terror Attack Threat News Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! मुंबईवर २६/११ सारख्या घातक हल्ल्याची धमकी; कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज

Mumbai Terror Attack Threat News : मुंबईवर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईवर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला (Terror Attack) करण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. मुंबई पोलिस (Mumbai Police) ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये २६/११ सारखा घातक हल्ला (26/11 Attack On Mumbai) करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस आले असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला करण्यासाठी भारतात असलेल्या ६ जणांची मदत घेणार असल्याचं धमकी देणाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादी हल्ल्याचे सावट आले आहे. (Treat Attack Call On Mumbai)

हे देखील पाहा -

मुंबईला (Mumbai) मोठा समुद्र किनारा लागलेला आहे. याच अरबी समुद्रातून दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या इतर साथीदारांनी भारतात येत २६/११ (26/11 Attack) सारख्या दहशतवादी हल्ला घडवून आणला. याची झळ आजही मुंबईला बसत आहे. त्यात आता ऑगस्टपासून भारतात विविध मोठ्या सणांना सुरुवात होती. ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवदेखील सुरू होत आहे. अशात मुंबईवर दहशतवादी हल्लाचं सावट असल्यानं सुरक्षा यंत्रणांचं टेन्शन वाढलं आहे.

दहशतवादी हल्ल्याचा मॅसेज -

जी मुबारक हो ! मुंबईत हल्ला होणार आहे. 26/11 हल्ल्याची आठवण करुन देणारा हा हल्ला असेल. सध्या मुंबईला उडवण्याची तयारी सुरु आहे. मुंबई उडवून देण्याची यूपी एटीएसची इच्छा आहे. मी पाकिस्तानातून आहे आणि तुमचे काही भारतीयही माझ्यासोबत आहेत ज्यांना मुंबई उडवायची आहे. इनाम अली, तोहीद, नदीम, आसिफ ज्यांना मामा नावानंही ओळखतात, मोहम्मद असिफ, खर्रस कुरेशी, आमीर सिद्दिकी, रिजवान जो मुजफ्फरनगरमधून आहे, शादाब सर ऑफ सरफराज, मोहम्मद रियाज, मोहम्मद यासीर, मोहम्मद शोएब, मोहम्मद फैयान, मोहम्मद अजमल सिद्दिकी ही ती माणसं आहेत जी माझी मदत करतील.

मुंबई उडवण्याची पूर्ण तयारी झाली असून फक्त काही वेळ बाकी आहे, कधीही हल्ला करु शकतो. 26/11 तर तुम्हाला लक्षात असेल. लक्षात नसेल तर पुन्हा बघा चांगलं होईल आणि ही धमकी नसून आम्ही खरंच येणार आहोत. माझं लोकेशन इथे ऍड्रेस होईल मात्र काम मुंबई होणार. आमच्या लोकांचं कोणतही ठिकाण नसतं. लोकेशन तुम्हाला ऑऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. हल्ला 26/11 मुंबईत होणार. उदयपूरसारखाही कांड होऊ शकतो. शीर धडापासून वेगळं करु.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच, रायगडमधील हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी एक संशयित बोट आढळली होती. या बोटीमध्ये एके-४७ आढळली होती. बोटीमध्ये एकूण तीन बंदुकांनी भरलेली बॅग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे तपास सुरक्षा यंत्रणा अगोदरच हाय अलर्टवर आहेत. एकीकडे रायगडच्या समुद्रात संशयास्पद बोट सापडणे, त्यात हत्यारं सापडणे आणि आता मुंबईवर हल्ल्याची धमकी याचं काही कनेक्शन आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT