BJP RajyaSabha Saam TV
मुंबई/पुणे

BJP RajyaSabha Candidate: भाजपकडून राज्यसभेसाठी 'या' दोन नावांवर शिक्कामोर्तब

सध्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यात रस्सीखेच सुरु असताना भाजपकडून आपल्या दोन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री, तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अनिल बोंडे (Anil Bonde) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यभरात रस्सीखेच सुरु असताना अनिल बोंडेंना ही उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच भाजपनेते पियूष गोयल (Piyush Goyal) यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांना राज्यसभेचे उमेदवारी दिल्यामुळे आता भाजपचा राज्यसभेचा (Rajyasabha) उमेदवार कोण? या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी अनिल बोंडेंना देण्यात आल्यामुळे माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांचा पुन्हा एकदा पत्ता कट झाला आहे. राज्यसभेसाठी विनोद तावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती मात्र त्यांना संधी देण्यात आलेली नाही. त्या ऐवजी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना भाजपने संधी दिली आहे. दरम्यान अनिल बोंडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गटातले असल्याने त्यांना संधी दिल्याची भाजपमध्ये चर्चा सुरु आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT