AI transformation reshapes hiring trends as major IT firms like TCS signal slowdown in recruitment. saam tv
मुंबई/पुणे

वाढदिवसाचा केक खाणं महागात पडलं, केकचा घास, 3 वर्षाच्या मुलाचा जीव धोक्यात

Designer Cake Shock: लहान मुलांच्या वाढदिवसाला थीम केक घेताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण एका 3 वर्षांच्या चिमुकल्याला वाढदिवसाचा केक खाणं कसं महागात पडलयं. ? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मुलांच्या वाढदिवसाला तुम्ही डिझायनर किंवा थीम केक आणताय? तर ची तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. केक खाताना मुलांनी जरा दमानं खावं असं आपण म्हणतो, पण ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात एका 3 वर्षांच्या चिमुरड्याचं बर्थ डे सेलिब्रेशन थीम केकमुळे जीवघेणं ठरण्याची वेळ आली होती.

केक खाताय, सावधान !

३ वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला 'स्पॉयडरमॅन थीम' चा केक मागवला

केकमधील सजावटीसाठी धातूच्या पिन वापरलेल्या

मुलानं या केकमधील 2 पिना गिळल्या

मुलानं केकसह पिन गिळल्याचा प्रकार पालकांना दुसऱ्या दिवशी समजला

हॉस्पिटलमध्ये एक्स-रे केल्यावर 2 पिना लहान आतड्यात दिसल्या

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर 48 तासांत पिना नैसर्गिकरित्या बाहेर पडल्या..

आजकाल मुलांच्या वाढदिवसाला 'थीम केक' किंवा 'डिझायनर केक' आणण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र, या केक्सच्या सजावटीसाठी आतून टूथपिक, प्लास्टिकच्या काड्या किंवा थेट अशा जीवघेण्या धातूच्या पिना वापरतात. त्यामुळे मुलांना असा केक देण्यापूर्वी पालकांनी तो स्वतः नीट हाताने तपासून पाहावा. मात्र बेकरी चालकांच्या अशा निष्काळजीपणामुळे एखाद्या चिमुरड्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे डिझायनर केक आणताना शंभर वेळा विचार करा आणि खाण्याआधी तो केक सुरक्षित आहे का, याची तपासणी नक्की करा....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT