Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : पार्क केलेल्या गाडीच्या काचा फोडून किमती वस्तू चोरी; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

खार पोलिसांची कारवाई, तब्बल 48 तास सापळा रचून आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईच्या (Mumbai) खार पश्चिम आणि आसपासच्या परिसरामध्ये पार्क केलेल्या गाद्यांच्या काचा फोडून कारमधील किमती वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात खार पोलिसांना यश आले आहे. तब्बल 60 हून अधिक सीसीटीव्हीचा माघोवा घेत खार पोलिसांनी (Khar Police) वांद्रे येथून आरोपीला अटक केली आहे. साहिल जमिल कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात, राजस्थान आणि मुंबई अशा ठिकाणी एकूण 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. (Mumbai Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, खार लिंकिंग रोड परिसरात फिर्यादी एक डिसेंबर या दिवशी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता आपली चार चाकी गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. जेवण आटोपल्यानंतर फिर्यादी पुन्हा गाडीकडे आले असता त्यांच्या गाडीच्या मागील खिडकीच्या काचा कोणीतरी फोडून आतमध्ये ठेवलेले 32000 हजार किंमतीचे वस्तु चोरून नेल्याचे आढळून आले यांनतर त्यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून त्वरीत खार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने गुन्ह्याचा तपास सुरु केला.पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सरकारी तसेच खाजगी 60 हून अधिक सिसिटीव्ही कॉमेरे तपासल्यानंतर संशयीत व्यक्तीच्या हालचाली आढळून आल्या. त्यात संशयित इसमाचा चेहरा स्पष्ट झाला, तो बांद्रा पोलीस ठाणेचे अभिलेखावरील आरोपी साहिल जमिल कुरेशी असल्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. ना निकम यांनी त्यास ओळखले.

आरोपी जात असलेल्सा मार्गावरील कॅमेरे चेक करून तो राहत असलेल्या पत्त्यावर पोलीस पोहोचले. मात्र तो मिळुन आला नाही- त्यावेळी पोलीस पथकाने तो येणे जाण्याचा मार्ग असलेले खार स्टेशन येथे सतत ४८ तास त्याचे येणेच्या वेळेस वाट खार पोलीसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे तसेच पारंपारीक पध्दतीने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीस अटक केली.तपासात आरोपी हा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असुन महाराष्ट्र, गुजरात येथे जबरी चोरी,गाडीची काच फोडुन वस्तू चोरी करण्याच्या पध्दतीचे एकुण २४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime : दबक्या पावलांनी घरात घुसले, लाखोंची सोन-चांदी लुबाडली; बीडमध्ये मध्यरात्री जबरी घरफोडी

लाडक्या बहि‍णींना २ लाख रुपये मिळणार; पहिला हप्ता २० हजारांचा असणार, जाणून घ्या अटी आणि पात्रता?

Maharashtra Live News Update: नरेश अरोरा यांचे बंधू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Pune : पुणे महानगरपालिकेत थरार, अधिकाऱ्याने टाळाटाळ केली, तरुणाने डोक्याला बंदूक लावली अन्...

Thane Ring Metro: रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास होणार सुलभ, २९किमी अंतरात असतील २२ स्थानकं; कुठे-कसा असणार मार्ग?

SCROLL FOR NEXT