पोलीस चौकी समोरील मेडिकल दुकान चोरट्यांनी फोडले  SaamTv
मुंबई/पुणे

पोलीस चौकी समोरील मेडिकल दुकान चोरट्यांनी फोडले

हरातील मानपाडा मुख्य रस्त्यावर असणाऱ्या शिवाजी उद्योग नगर पोलीस चौकी समोरील शिवम मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोकड आणि सामानाची चोरी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोंबिवली - शहरातील मानपाडा मुख्य रस्त्यावर असणाऱ्या शिवाजी उद्योग नगर पोलीस चौकी समोरील शिवम मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोकड आणि सामानाची चोरी केली आहे. पोलिसांच्या नाकावर टिचून भर रस्त्यावर चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. Theft In Medical Shop In Front Of Police Station

हे देखील पहा -

डोंबिवली शहरातील दुधनाथ यादव यांच्या शिवम मेडिकलचे शटर उचकवून चोरट्यांनी सकाळी 5 च्या दरम्यान दुकानात प्रवेश केला. दुकानातील 15 हजाराची रोकड आणि कॉस्मेटिक सामानाची देखील चोरी केली. शहराच्या सदैव वर्दळ असणाऱ्या भागात चोरी करून चोरट्यांची हिंमत वाढविल्याचे दिसून येत आहे.

दुकानाच्या बाजूला 24 तास चालणारे ऑप्टिलाईफ हॉस्पिटल आहे. या भागात सदैव पेशंट ची येजा असते असे असतांना देखील चोरांनी केलेली हिम्मत चिंताजनक आहे. दुकानाच्या सी सी टी व्ही मध्ये चोराचा चेहरा दिसून येत असून रोकड आणि सामान पिशवी मध्ये भरतांनाचे फुटेज मिळाले आहे. पोलिसांकडे तक्रार दिली असून फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT