#Shocking News | धावती ट्रेन पकडताना महिलेचा गेला तोल...पाहा व्हिडिओ आणि धावती ट्रेन पकडू नका! (पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

#Shocking News | धावती ट्रेन पकडताना महिलेचा गेला तोल...पाहा व्हिडिओ आणि धावती ट्रेन पकडू नका! (पहा व्हिडिओ)

ट्रेनने स्टेशन सोडले होते आणि हे वृद्ध जोडपे चहा पिण्याकरिता खाली आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ट्रेनने स्टेशन सोडले होते आणि हे वृद्ध जोडपे चहा पिण्याकरिता खाली आले होते. आता काय करावे, ट्रेन देखील सोडू शकत नवतो.. म्हणून अगोदर त्या महिलेने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि मग तेच घडले, ज्याची भीती होती. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईत वृद्ध महिलेने आपला तोल गमावला आणि ट्रेनसह खेचली गेली.

पण महिलेच्या पतीने घाबरण्या ऐवजी पत्नीला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि तिला रुळावर पडण्यापासून बचावले आहे. अधिक लोक मदतीकरिता येईपर्यंत पतीने आपल्या पत्नीला धरून ठेवले होते. इतक्यात जवळचे सर्व प्रवासी धावत आले आणि त्यांनी त्या महिलेला प्लॅटफॉर्मवर खेचले. प्रचंड गर्दी जमलेली बघून रेल्वेचे २ पोलिस कर्मचारी देखील त्या घटनास्थळी पोहोचले.

पहा व्हिडिओ-

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई रोड रेल्वे स्टेशनवर या हृदयद्रावक अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. प्रमिला मारो असे या महिलेचे नाव देण्यात आले आहे. ती 70 वर्षांची आहे. ती गुजरातमधील भावनगर येथून पतीसह हैदराबादला जात होती. हे दोघे वसई रोड स्टेशनवर चहा पिण्याकरिता खाली आले होते.

अचानक ट्रेन सुरू झाली आणि नंतर ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रक्रियेत अपघात झाला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक म्हणत आहेत की, जर पती नसता तर त्या महिलेला रेल्वे ट्रॅकवर पडण्यापासून वाचवणे खूप कठीण झाले असते. देशातील रेल्वे स्थानकांवर रोज अपघात घडतात. पण अरेरे, ट्रेन पकडण्याच्या प्रक्रियेत लोक हे विसरतात की जीवनाची गाडी कायमची मागे राहू नये.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

SCROLL FOR NEXT