सोसायटी जवळील विहीर बनली मद्यपी, टवाळखोरांचा अड्डा  जयश्री मोरे
मुंबई/पुणे

सोसायटी जवळील विहीर बनली मद्यपी, टवाळखोरांचा अड्डा

मुंबईतल्या देवनार मधे केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या जागेमध्ये एक विहीर आहे. जी विहीर देवनार व्हिलेज मार्गावरील दत्तगुरु सोसायटी येथील बंगल्यांना लागून असून विहिरीजवळ मद्यपी व टवाळखोरांचा अड्डा बनला आहे.

जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई: मुंबईतल्या Mumbai देवनार मधे केंद्र सरकारच्या Central Government ताब्यात असलेल्या जागेमध्ये एक विहीर आहे. जी विहीर देवनार व्हिलेज मार्गावरील दत्तगुरु सोसायटी येथील बंगल्यांना लागून असून विहिरीजवळ मद्यपी व टवाळखोरांचा Alcoholics and drunkards अड्डा बनला आहे. The well near the society became a haunt of drunkards

या बेवारस विहिरीत दररोज पोहोण्याच्या बहाण्याने दररोज ६० ते ७० टवाळखोर मुल येतात. तेथे दिवसभर प्रचंड धिंगाणा घालतात. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, विवस्त्र अवस्थेत दिवसभर राहणे, बीभत्स हातवारे, अमली पदार्थाचे सेवन, दारूचे सेवन, धुम्रपान या गैरकृत्यांमुळे येथील नागरिक Citizens त्रस्त झाले आहेत.

हे देखील पहा-

दत्तगुरू सोसायटी Dattaguru Society संकुलात एकूण १५२ बंगले आहेत, सोसायटीच्या काही बंगल्यांच्या बाजूने मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तसेच कोणतीच सुरक्षा यंत्रणा देखील नाही. याच विहिरीत दोन वर्षापूर्वी बेवारस अवस्थेत एक मृतदेह सुद्धा सापडला होता. त्यामुळे हळूहळू ही मोकळी जागा गुन्हेगारांचा अड्डा बनू लागली आहे.

कोरोनाच्या Corona काळात सर्वांचे वर्क फ्रॉम होम Work From Home सुरू आहे आणि विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन Online माध्यमातून शिकत आहेत. मात्र दिवसभर सुरु असणाऱ्या गोंधळामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रासले आहेत. येथे येणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. याचा कायम बंदोबस्त होणे गरजेचे आहे.

याबाबत पोलिस Police काय कारवाई करणार याबाबत गोवंडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस अधिकारी यांची प्रतिक्रिया प्रतिनिधी ने घेतली असता, पोलिस कॉल आल्यावर गाडी पाठवल्या जातात. परंतु तेव्हा टवाळखोर तेथून पळ काढतात. ही जागा केंद्र सरकारची असून त्या ठिकाणी एम टी एन एल चे कर्मचारी राहतात. त्यानी सुरक्षा रक्षक नेमल्यास पोलीस बंदोबस्त देऊन त्या असामाजिक तत्वांचा बिमोड करता येऊ शकेल अशी माहिती देण्यात आली आहे.

Edited By-sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Cylinder : आता रांगेत उभे राहायची गरज नाही ; घरबसल्या ५ मिनिटांत करा एलपीजी कनेक्शन बंद, पैसेही परत मिळतील

Blood Pressure Walk: रोज फक्त १५ मिनिटं चाला, काही दिवसांत BP येईल नियंत्रणात; तज्ज्ञ काय सांगतात?

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

IAS Transfers India: प्रशासकीय सेवेत मोठा फेरबदल; २४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, वीर विक्रम यादव DGCA चे नवे प्रमुख

Face Care: टॅनिंग कमी करुन 3 दिवसात मिळवा ग्लोईंग फेस, वापरा 'हा' होममेड स्पेशल फेस मास्क

SCROLL FOR NEXT