Burning Rickshaw Video विकास काटे
मुंबई/पुणे

Burning Car Video: ठाण्यात बर्निंग कारचा थरार; चालत्या कारला लागलेल्या आगीत दोन रिक्षाही जळून खाक

Burning Rickshaw Video Thane: ही गाडी ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जात होती.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

Thane News: ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाण्यात एका चालत्या कारने भर रस्त्यात अचानक पेट घेतला. कारला लागलेल्या आगीच्या विखळ्यात दोन रिक्षाही आल्या आणि जळून खाक झाल्या. अचानक लागलेल्या आगीमुळे रस्त्यावरील वाहनचालकांचा एकच गोंधळ उडाला. या आगीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Thane Fire News)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे (Thane) शहरातील गोकुळ नगरच्या नाक्यावर ही थरारक घटना घडली. आज, मंगळवारी पहाटे एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. ही गाडी ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जात होती. कारला आग (Burning Car) लागल्याचं चालकाच्या लक्षात येताच तो त्वरीत गाडीबाहेर पडला. बघता-बघता कारला मोठी आग लागली.

ही आग वाढल्याने कारजवळच उभ्या असलेल्या दोन रिक्षांनीही पेट घेतला. एकाच वेळी कार आणि दोन रिक्षांना आग लागल्याने परिसरात काळ्या धुराचे मोठे लोट पसरले. यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांचा एकच गोंधळ उडाला.

पाहा व्हिडिओ -

या घटनेची माहिती मिळताच ठाण्यातील अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी पोहोचले आणि काही मिनिटातच आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. या आगीत जळून खाक झाली आहे, तर दोन्ही रिक्षांचंही मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारने अचानक पेट का घेतला याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT