Navi Mumbai New Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai New: निधनानंतरही आई जिवंत राहण्यासाठी मुलाने लढवली शक्कल; सर्व स्तरातून होतंय कौतुक

नवी मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या आईच्या निधनानंतर त्यांचे एकूण १० अवयव दान केले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai New: जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे आपण स्वत: आहोत असे म्हटले जाते. कारण लाखमोलाचे अवयव आपल्याला जन्मता मिळतात. मात्र काहींना जन्मता अंधत्व किंवा इतर काही व्याधी असतात. अशात लाखमोलाचे हे अवयव लाखो रुपये खर्च करुनही मिळणे कठीण असते. त्यामुळे अवयव दान करणे फार गरजेचे आहे. हिच बाब लक्षात घेत नवी मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या आईच्या निधनानंतर त्यांचे एकूण १० अवयव दान केले आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे सर्वच स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Mumbai) बामनडोंगरी येथील ताराबाई म्हात्रे या ५९ वर्षीय महिलेचा डोक्याला मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असताना ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले. आईच्या निधनाने मुलावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. मात्र स्वत:ला सावरत मुलाने आपली आई जिवंत रहावी तिला हे जग पाहता यावे, या जगात वावरता यावे यासाठी आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

मुलासह कुटुंबियांनी आईच्या शरीरातील अवयव दान (Donte) करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. रुग्णालयातील डॉक्टरांनी कोणतीही वेळ न दवडता तात्काळ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू केली. ताराबाई यांच्या शरीरातील यकृत आणि किडनी ग्रीन कॉरिडॉर तयार करून इतर रुग्णालयातील रुग्णांना पोहचविले गेले तर इतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून शासकीय नियमांच्या अधीन राहून पुरवले जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत ताराबाई यांचे १० अवयव दान करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबियांच्या या उत्तम निर्णयाने सहा ते सात जणांचे जीव वाचले जाणार आहेत.

आपल्याला याचे समाधान असून आई (Mother) जिवंत असल्याचा आनंद मिळतोय. आमच्या निर्णयाने अनेकांचे जीव वाचतील हीच आईला श्रद्धांजली ठरेल अशी भावना मयत महिलेच्या मुलाने पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली आहे. या धाडसी निर्णयाचे आम्ही स्वागत करतोय. त्यांनी दान केलेल्या अवयवांना योग्य रुग्णाला गरजेनुसार आणि शासकीय नियमानुसार पुरवले जाणार असून याबाबत अनेकांनी बोध घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टर सोनटक्के यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT