मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरला सुमित सावंत
मुंबई/पुणे

मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरला

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

हे देखील पहा -

तुळशी तलावाबाबत संक्षिप्त माहिती

हा तुळशी तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.

हा कृत्रिम तलाव असून याचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.

या तलावाच्या बांधकामासाठी जवळपास ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

ह्या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.

हा तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा असतो.

हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT