उधार दारु न दिल्याने दुकानदाराला दगडाने मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद  अश्विनी जाधव
मुंबई/पुणे

उधार दारु न दिल्याने दुकानदाराला दगडाने मारहाण; मारहाणीची घटना CCTV मध्ये कैद

दुकानदाराने दारु उधार देण्यास नकार दिला त्यामुळे टोळीने शिवीगाळ करून दुकानदाराच्या डोक्यात आणि पाठीवर दगडाने मारहाण केल्यामुळे दुकानदार गंभीर जखमी झाला आहे.

अश्विनी जाधव-केदारी साम टीव्ही पुणे

पुणे : उधार दारू न दिल्यामुळे दुकानदाला जबर मारहाण केल्याची घटना पुण्यातील मांजरी येथे घडली आहे. तसंच हवी असलेली दारू न दिल्याच्या कारणावरून विक्रेत्यांला दगडाने मारहाण केली आहे दरम्यान हाणामारीचा हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून हडपसर पोलिस ठाण्यामध्ये (Hadapsar Police Station) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने उधारीवर दारूची मागणी केली होती 25 डिसेंबरला रात्री साडेदहा ते 11 वाजेच्या सुमारास मांजरी येथे दरडे मार्गावरील शिवाज्ञा बिअर शॉपीमध्ये सदर घटना घडली आहे. (The shopkeeper was beaten for not lending alcohol)

एका व्यक्तीने दारू उधार मागितली असता दुकानदाराने उधार देण्यास नकार दिला त्यामुळे टोळीने शिवीगाळ करून विक्रेत्याच्या डोक्यात आणि पाठीवर दगडाने मारहाण केल्यामुळे दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दुकानदार साईराज सुधीर हिंगणे वय 27 रा. मांजरी यांनी तक्रार दिली असता. संतोष घुले वय 29 रा. गोपाळपटी, मांजरी व ओमकार घाडगे वय 26 रा. मांजरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT