NCP Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

'आमदार सांभाळणं सोप्प नाही; दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार'

'दोन महिन्याभरात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार आणि महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

बारामती : दोन महिन्याभरात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार आणि महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी केलं आहे. त्या बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांना (Sharad Pawar) दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, 'शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणतात पुढचे 25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. पण त्यांनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये, मुळात आत्ताच जे सरकार सत्तेत आलं आहे. ते शिंदे-फडणवीस हे सरकार छळकपट हिटलरशाही आणि दबाव यंत्रणांचा वापर करुन आलेले आहे. शिवाय महिना दोन महिन्यांमध्ये काय परिस्थिती होतेय ते बघा. हे सरकार परत उलटणार आणि महाविकास आघाडी परत सत्तेत येणार आहे.

पाहा व्हिडीओ -

आमदार सांभाळणं महाराष्ट्राचा कारभार सांभाळणं तेवढं सोप्प नाहीये ते फक्त अजित पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. राज्य सांभाळनं एकनाथ शिंदे यांना जमणार नाही असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

तर सरकारने शेतकऱ्यांना मदत करून त्यांना मोबदला द्यायला पाहिजे, पण ईडी सरकारचं लक्ष शेतकऱ्यांकडे नाहीये. केवळ आमदार फोडणे, कुरघोड्या करणे, दबाव तंत्र वापरुन विरोधात बोलतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवणे हेच सुरु आहे. तर आपण जेलला घाबरत नाही त्यामुळे समोर डायरेक्ट बोलते असंही रुपाली ठोंबरे यावेळी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिनेता आमिर खानच्या भाच्याला मोठा झटका! आंदोलनात सहभागी होणे पडले महागात; मुंबई पोलिसांनी दिली देश सोडण्याची नोटीस

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोडी! खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मोठा निर्णय होणार?

Fennel Seeds Milk Benefits For Back Pain: दुधात बडीशेप मिसळून पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, कंबरदुखी आणि थकवा होईल झटपट दूर

भाजपची मोठी कारवाई; ३ बड्या नेत्यांना ६ वर्षांसाठी केले निलंबित

Rice Cause Diabetes: भात खाल्ल्याने खरंच मधुमेह होतो? हे वाचा, सर्वात मोठा गैरसमज होईल दूर

SCROLL FOR NEXT