शाळेची एक चुक अन् टॅापर विद्यार्थ्यांवर आली वनवन फिरायची वेळ  अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

शाळेची एक चुक अन् टॅापर विद्यार्थ्यांवर आली वनवन फिरायची वेळ

पुण्यातील नुमवी मुलांच्या शाळेतुन इयत्ता 10 वीतून उत्तीर्ण झालेला सक्षम तेलतुंबडे. गेल्या काही दिवसांपासून हा विद्यार्थी 11 वी प्रवेशात आय टी विषय मिळवण्यासाठी धडपडत आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: वर्गात नेहमी पहिला येणारा विद्यार्थी दहावीला दुसरा क्रमांक मिळवतो, गुणांबाबत शाळेकडे पाठपुरावा केल्यावर समजते की शाळेच्या चुकीमुळे बोर्डाकडे चुकीचे गुण पाठवले गेले आणि विद्यार्थ्याला फटका बसलाय, ही हकीकत आहे पुण्यातील नुमवी शाळेतील सक्षम तेलतुंबडे या विद्यार्थ्याची.

पुण्यातील नुमवी मुलांच्या शाळेतुन इयत्ता 10 वीतून उत्तीर्ण झालेला सक्षम तेलतुंबडे. गेल्या काही दिवसांपासून हा विद्यार्थी 11 वी प्रवेशात आय टी विषय मिळवण्यासाठी धडपडत आहे. खरंतर सक्षम हा विद्यार्थी हुशार आहे, त्याला हव्या त्या महाविद्यालयात त्याला हवा असलेला विषय सहज मिळाला असता पण शाळेच्या चुकीमुळे त्याला आता वणवण फिरावं लागतंय. नेहमी वर्गात पहिला येणारा सक्षम दहावीला अचानक वर्गात दुसरा आला, तसेच गुणांबाबत शंका आल्याने त्याने शाळेकडे विचारणा केली, त्यावेळी शाळेकडून चुकीचे गुण बोर्डाकडे पाठवल्याचे उघडकीस आले आहे.

शाळेने चूक झाल्याचा खुलासा केला. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापणाद्वारे गुण देण्यात आले. त्यात सक्षम सह काही विद्यार्थ्यांना मराठी विषयाचेच गुण संस्कृत विषयाला देण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणात घोळ झाल्याचे शाळेने ही मान्य केले आहे. याबाबत बोर्डाकडे सुधारित गुण पुन्हा पाठवले आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही बोर्डच करणार असल्याचे सांगत शाळेने हात वर केले आहे.

निकाल जाहीर झाल्यापासून सक्षम आणि त्याच्या पालकांनी शिक्षण विभागाच्या सर्व कार्यालयात चकरा मारल्या आहेत. शाळेने चूक मान्य करूनही बोर्डाकडून त्याच्या गुणांबाबत अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. कमी गुणांमुळे सक्षमला हवा तो विषय घेता येत नाहीये, शिक्षण विभागाची अनास्था यानिमित्ताने समोर आलीय, शाळेच्या चुकीमुळे वर्गात पहिला येण्याचा मान मात्र हिरावला गेला हे खरं.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT