शिरूर येथे बँकेवर भरदिवसा दरोडा टाकणारे दरोडेखोर अखेर सापडले! सागर आव्हाड
मुंबई/पुणे

शिरूर येथे बँकेवर भरदिवसा दरोडा टाकणारे दरोडेखोर अखेर सापडले!

2 कोटी 19 लाखाचे सोने व 18 लाखाची रोकड जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : भरदिवसा शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर पिस्तुलाचा धाक दाखवून पावणे तीन कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून 2 कोटी 19 लाखाचे सोने व 18 लाखाची रोकड जप्त केली आहे.

डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, अंकुर महादेव पावळे, धोंडीबा महादु जाधव, आदिनाथ मच्छिद्र पठारे, विकास सुरेश गुंजाळ अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

हे देखील पहा :

21 ऑक्टोबर रोजी दुपारी पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र वर दुपारी सव्वा एक वाजता सशस्त्र दरोडा पडला होता. 5 आरोपीनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व ग्राहकांना हातातील पिस्तुलचा धाक दाखवून कॅशियर यास हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्यांनी बँकेतील ३२ लाख ५२ हजार ५६० रोख रक्कम, २ कोटी ४७ लाख २० हजार ३९० रुपये किंमतीचे ८२४ तोळे १३० मि.ग्रॅ. वजनाचे सोने, असे एकूण २ कोटी ७९ लाख ७२ हजार ९५० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडा टाकून चोरुन नेले होते. या दरोडेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना करण्यात आली होती. अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT