नुकसानीची आकडेवारी आल्यानंतरच योग्य ती मदत करता येईल - बाळासाहेब थोरात गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

नुकसानीची आकडेवारी आल्यानंतरच योग्य ती मदत करता येईल - बाळासाहेब थोरात

दुष्काळाची माहिती आणि आकडेवारी आल्यानंतरच योग्य ती मदत करता येईल असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलं आहे.

गोपाळ मोटघरे

गुलाब चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मराठवाडा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांना ओल्या दुष्काळाची माहिती आणि आकडेवारी आल्यानंतरच योग्य ती मदत करता येईल असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलं आहे. (The right help can be given only after the loss figures are available - Balasaheb Thorat)

हे देखील पहा -

ओल्या दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री मंडळाची चर्चा झाली आहे. मात्र शेवटी मदत करत असताना झालेल्या नुकसानाची माहिती आणि आकडेवारी आल्यानंतरच योग्य मदत मदत करता येऊ शकेल असं बाळासाहेब थोरात म्हणाले. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीमध्ये कितीचा प्रभाग असावा याविषयी महाविकास आघाडीतील नेत्यांत वेगवेगळे मत होते, मात्र शेवटी मुख्यमंत्र्यांनी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्याला एकमताने सहमती दिली.

मात्र महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत, म्हणून आम्ही तीनचा प्रभाग तयार केला अशी काहीही संकल्पना आम्हाला त्यावेळी निर्णय घेताना सुचली नव्हती, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

SCROLL FOR NEXT