St Strike SaamTV
मुंबई/पुणे

ST Workers Strike: एसटी विलीनीकरणावर निर्णय? समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर होणार

हायकोर्टाच्या निर्देशानंतर सरकारने स्थापन केलेल्या ३ सदस्यीस समितीचा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये (State Government) विलीनीकरण करण्याविषयीचा निर्णय आज होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हायकोर्टाच्या (High Court) निर्देशानंतर सरकारने (government) स्थापन केलेल्या ३ सदस्यीस समितीचा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीत सादर केला जाणार आहे. या अहवालाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

त्यातही कोर्टाने २ आठवड्याचा वेळ दिला होता. जवळपास ३ महिन्यांपासून एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, आदी इतर मागण्यांवर संप पुकारला आहे. त्यापैकी विलीनीकरणाची मागणी वगळता इतर सर्व मागण्यांवर राज्य सरकारने (government) सकारात्मक भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वाढवण्यात आले आहे.

एसटी विलीनीकरणाबाबत (Merger) दाखल असलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टात हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावेळेस एसटी विलीनीकरणाबाबत समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला नाही. यामुळे सरकारने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात सांगण्यात आले होते. एसटी विलीनीकरणाविषयीचा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूरी मिळाल्यावर परत उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT