'नाम'मधला 'आपला माणूस' पुन्हा एकदा लोकांच्या मदतीला; पाहा Video Saam Tv
मुंबई/पुणे

'नाम'मधला 'आपला माणूस' पुन्हा एकदा लोकांच्या मदतीला; पाहा Video

पुणे जिल्ह्यातील (Pune District) बहुली गावात आगीत जळालेली घरं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून बांधून देण्यात आली आहेत.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे जिल्ह्यातील (Pune District) बहुली गावात आगीत जळालेली घरं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून बांधून देण्यात आली आहेत. संबंधीत लोकांना मदत नाहीतर आधार दिला आहे, असे मत नाम फाउंडेशनचे संस्थापक आणि अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. नाम फाउंडेशनची स्थापना ही आधार देण्यासाठी झाली आहे असेही नाना म्हणाले. १६ कुटुंबाची घरं जळाली होती, फक्त ती म्हणजे बांधून दिली यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली असल्याचं नानांनी सांगितले.

लॉकडाऊन करणं सरकारचा नाईलाज आहे. सरकारला सहकार्य केलंच पाहिजे पण आपण दुसऱ्याला मदत केली पाहिजे. उपाशी कोणी राहणार नाही याची जबाबदारी घेतली पाहिजे प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करेल असेही नाना पाटेकर म्हणाले. नाम फाउंडेशन साखरपे पॅटर्न राबवणार आहे. चिपळूण, महाडला हा पॅटर्न राबविला जाणार आहे. लवकरच त्या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती नाना पाटेकर यांनी दिली.

पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्या मधला आपला माणूस समोर आला आहे. ते म्हणाले मुस्लिम लोकही माणसंच आहे. जात धर्माच्या पलीकडे आपण कधी विचार करणार का? चार पाच पिढ्यांपूर्वी कन्व्हर्ट झालेले लोक आहेत. माणूस म्हणून आपण कधी जगणार? राजकिय तीन चार करंटे लोक आहेत त्यांच्यामुळे हे होत आहे. मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे असे मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT