Little Girl Falls From Building in Vasai चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Vasai: मोबाईलवर खेळत-खेळत ती बाल्कनीत आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चिमुकलीच्या दुर्देवी मृत्यूने हळहळ

Little Girl Falls From Building in Vasai : जेव्हा हा अपघात झाला तेव्हा ही चिमुकली घरी एकटीच होती.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई: इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा (Little Girl) दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना मुंबईलगत्या वसईमधील (Vasai) असून जेव्हा हा अपघात झाला तेव्हा ही चिमुकली घरी एकटीच होती. घराच्या बाल्कनीतून या चिमुकलीचा तोल जाऊन तिचा जागीच मृत्यू झाला आहे. (Vasai Little Girl Accidental Death News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार वसई पश्चिमेच्या अग्रवाल कॉम्प्लेक्समधील रेजन्सी विला या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली पडून साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रेया महाजन असं या मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. काल, शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रेयाची आई तिच्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली असताना श्रेया घरात एकटीच होती. मोबाईलवर खेळता खेळता ती बाल्कनीमध्ये आली होती.

बाल्कनीमध्ये आली असताना यावेळी तिच्या हातातील मोबाईल खाली पडला. तो मोबाईल परत मिळवण्यासाठी ती मोबाईलच्या नादात ग्रीलवर चढली. मात्र याच दरम्यान या चिमुकलीचा तोल गेल्याने ती बाल्कनीतून खाली पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? बारामतीमधील बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या भूम तालुक्यातील गावातल्या शेकडो शेतकऱ्याचं रास्ता रोको

Gold Rate: सोन्याचे दर ₹८५००० पर्यंत घसरणार? आता खरेदी करावं की नाही

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

SCROLL FOR NEXT