अंबरनाथमधील 'तो' सोनसाखळी चोर अखेर जेरबंद अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथमधील 'तो' सोनसाखळी चोर अखेर जेरबंद

अंबरनाथमधील 'तो' सोनसाखळी चोर अखेर जेरबंद झाला आहे. खुंटवली परिसरातून याने महिलेचं मंगळसूत्र चोरलं होतं, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथच्या खुंटवली परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीचा अखेर उलगडा झालाय. या सोनसाखळी चोराला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांचीही उकल करण्यात पोलिसांना यश आलंय.

हे देखील पहा -

अंबरनाथच्या खुंटवली परिसरात आशा कराळे यांचं टेलरिंग आणि किराणा दुकान आहे. या दुकानात २६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन सोनसाखळी चोरांनी बिस्कीट घेण्याच्या निमित्तानं जाऊन आशा कराळे यांचं मंगळसूत्र चोरलं होतं. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेनंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असतानाच आरोपी प्रकाश उर्फ पिल्ल्या प्रकाश ठमके याला भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली. त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी त्याचा ताबा घेत चौकशी केली असता त्याने खुंटवलीतील चेन स्नॅचिंग आपणच केल्याची कबुली दिली.

या चोरीसाठी वापरलेल्या टीव्हीएस अँटोरक्यू आणि यामाहा ब्लॅक गोल्ड या गाड्या शिवाजीनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली आरोपी आरोपी प्रकाश ठमके याने दिली. आरोपी प्रकाश ठमके याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे ५ गुन्हे दाखल असून त्यात आता या नव्या गुन्ह्यांची भर पडली आहे.

अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीमचे उपनिरीक्षक प्रवीण खोचरे आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident: भीषण अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलाखाली कोसळली

Prakash Raj : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं ८६ व्या वर्षी निधन

Maharashtra Live News Update: : जळगाव शहरासह परिसरात अवकाळी पाऊस

Vastu Tips For Water: किचनमध्ये 'या' दिशेला ठेवा पाण्याचे भांडे, रात्रीतून बदलेल तुमचं नशीब

Pune: सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू, चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT