मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी

या रुग्णाने कोरोनाच्या लशीचे दोन्ही डोस घेतले होते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईमध्ये डेल्टा प्लस Delta Plus व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यूची Death नोंद करण्यात आली आहे. मुंबई Mumbai महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, मुंबईत ११ डेल्टा प्लसचे रूग्ण होते. त्यापैकी आता एकाचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या रुग्णाने कोरोनाच्या लशीचे दोन्ही डोस घेतले होते.

मुंबईतील ५५ वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेला मधुमेहासह इतर आजारही होते. ही महिला घरीच ऑक्सिजनवर होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, आता राज्यातील डेल्टा प्लस मृतांची संख्या दोन इतकी झाली आहे. याआधी जून महिन्यात रत्नागिरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. राज्यात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये सापडला होता. पण आता ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा डेल्टा प्लसने डोकं वर काढलं आहे. पुन्हा डेल्टा प्लसच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

११ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबईमध्ये , पुण्यामध्ये ७ , नांदेडमध्ये ३, गोंदिया, रायगड, पालघरमध्ये प्रत्येकी २ तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT