Kirit Somaiya  Saam Tv
मुंबई/पुणे

FIR मध्ये सोमय्यांच्या गाडीवर फक्त दगड फेकल्याचा उल्लेख

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता एक नवी माहिती पुढे आली आहे. FIR मध्ये सोमय्यांच्या (Kirit Somaiya) गाडीवर फक्त दगड फेकल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर सोमय्या म्हणाले होते की, माझ्यावरील हल्ल्याला पोलीस (Police) आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत. मी पोलिसांना सांगितले होते की, आपल्यावर हल्ला होणार आहे.

हे देखील पाहा-

मात्र, ते म्हणाले की आम्ही जबाबदारी घेतली आहे, पण गेट उघडताच गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. पोलिसांनी त्यांना सहकार्य केले आहे. हे पाप पोलिसांचे आहे. याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार राहणार आहेत, असा हल्लाबोल सोमय्या यांनी केला आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकात गेले होते.पोलिसांच्या हजेरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) गुंड मारहाण करतात. ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर आरोप (Allegations) करत पांडेंनी घटनेचे cctv फुटेज गायब केले आहेत, त्यांची खात्यांतर्गत चौकशी करा अशी मागणी केली आहे. सोमय्या म्हणाले की, खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला (Attack) करण्यात आला, तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. किरीट सोमय्याचा मनसुख हिरेन करायचा असे नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचा खळबळजनक दावाही किरीट सोमय्यांनी केला होता. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने संजय पांडेंनी घडवून आणला आहे. असे सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT