NCB  SaamTV
मुंबई/पुणे

बरं झालं... NCB च्या कारवाईची खरी वस्तुस्थिती लोकांसमोर आली - जयंत पाटील

जयंत पाटील यांनी क्रुझ ड्रग्ज पार्टी आणि एनसीबी कारवाईवरती प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : 'बरं झालं लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती यायला लागलीय' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी क्रुझ ड्रग्ज पार्टी आणि एनसीबी कारवाईवरती प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पहा -

भाजपचे केंद्रसरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय हे आज टिव्हीवर ऐकल्यावर व पाहिल्यावर लक्षात येते आहे असेही जयंत पाटील म्हणाले. आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांना पकडून नेण्यात भाजपचे लोक पुढे होते. त्यानंतर अशी पैशाची मागणी होत असेल तर बरेच लोक यामध्ये सहभागी असण्याची शक्यता जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

प्रभाकर साईलचा खुलासा...

किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने (Kiran Gosavi's bodyguard Prabhakar Sail) या प्रकरणाबाबत काही खळबळजनक खुलासे केले आहेत. प्रभाकरच्या म्हण्यानुसार समीर वानखडेंनी क्रूझवर (Cruise Drugs Party Raid) रेड टाकताना किरण गोसावीला बरोबर घेऊन गेले होते. रेडनंतर आर्यनला NCB ने ताब्यात घेतल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी (Shah Rukh Khan's manager Pooja Dadlani) या किरण गोसावी आणि सॅम नावाची व्यक्ती भेटली असल्याचे प्रभाकरने सांगितले. तसेच आपन 50 लाख कॅश घेऊन वाशीला गेलो आणि पैसे किरण गोसावीला दिल्याचा आरोप त्याने वानखेडे आणि गोसावी यांच्यावर केले आहेत आणि यावरुनच आता भाजपसह वानखेडेंवरती महाविकास आघाडी सरकारकडून आरोप करण्यात येत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT