क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण म्हणजे 'NCB' ने रचलेल्या आणि पेरलेल्या बातम्या
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण म्हणजे 'NCB' ने रचलेल्या आणि पेरलेल्या बातम्या SaamTV
मुंबई/पुणे

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण म्हणजे 'NCB' ने रचलेल्या आणि पेरलेल्या बातम्या; नवाब मलिकांचा गौप्यस्पोट !

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कॉर्डेलिया क्रुझ वरती काही सापडलच नसल्याचा गौप्यस्पोट करत भाजप आणि एनसीबीने मिळून ही तथाकथित कारवाई केली असल्याचा आरोप मलिक यांनी आज केला आहे. मलिक हे पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी NCB वरती अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.(The Cruise Drugs Party case is news framed by the NCB;Nawab Malik's statment)

हे देखील पहा -

भाजप बॉलिवूडला Bollywood बदनाम करत असून भाजपसोबत हातमिळवणी करत एनसीबीने ही क्रूझ Cruise वरिल कारवाई केलं असल्याचा आरोप देखील मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले, "देशाला नशामुक्त करण्यासाठी राजीव गांधी Rajiv Gandhi यांनी कायदा बनविला त्यासाठीच NCB ही संस्था देखील निर्माण केली. केवळ पोलिसांना अधिकार दिले तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकरण हाताळता येणार नाहीत

गेल्या वर्षभरापासून सगळ्या मीडियाच लक्ष NCB कडे आहे.

सुशांत सिंह राजपूत Sushant singh Rajput च्या वेळी सगळ बॉलिवूड NCB च्या रडारवर होतं. तसं वातावरण तयार केलं गेलं. 3 तारखेला क्रुजवर NCB ने raid केली आणि काही लोकांना ताब्यात घेतलं या दरम्यान NIA ने काही व्हिडीओ रिलीज केले त्यानंतर ज्या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतलं त्याच व्यक्तिचा आर्यन खानसोबतचा Aryan Khan सेल्फी व्हायरल झाला. या व्यक्ती संदर्भात NCB ला स्पष्टीकरण द्यावं लागेल,''

''दुसऱ्या व्हिडिओमध्ये अरबाज ला नेणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे, त्याच्या फेसबूकवर Facebook त्याचे अनेक भाजप नेत्यांसोबतचे फोटो आहेत. मनीष भानुशाली याचा NCB सोबत काय संबंध आहे हे स्पष्ट व्हावं. NCB ने सुरुवातीला 8-10 लोक ताब्यात घेतल्याचं सांगितलं. यात शंका वाटते. 10 लोक होते तर त्यातील 2 जणांना सोडलं का ? क्रुजवरुन जे पदार्थ जप्त केले त्यातही शंका वाटते, कारण सापडलेल्या वस्तू हा सील केल्या जातात, मग त्या एका अधिकाऱ्यांच्या खोलीतील आहेत.

हे सगळं प्रकरण खोटं आहे का?,'' असेही सवाल त्यांनी उपस्थित केले.

''मनीष भानुशाली 'Manish Bhanushali हा NCB चा कर्मचारी नसेल तर मग तो एवढया हाय प्रॉफाईल केसमधील आरोपीला हाताळण्याची परवानगी कशी ? 3 तारखेला झालेली सगळी रेड फेक आहे या नंतर भानुशाली हा दिल्लीत होता, अनेक मोठ्या लोकांना तो भेटला.. त्यानंतर गुजरातमध्ये जाऊन तो मंत्रालयात बैठका करतो. भानुशाली आणि ड्रगचे काय कनेक्शन आहे हे NCB ने स्पष्ट करावं, तसच भाजपने देखील भानुशाली याला काय जबाबदारी दिली आहे ? हे स्पष्ट करावं,'' अशीही मागणी त्यांनी केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

SCROLL FOR NEXT