Pune Railway Station Saam TV
मुंबई/पुणे

Pune : पुणे रेल्वे स्थानकातील 'त्या' प्रवाशाचा मृत्यू चेंगराचेंगरीमुळे नव्हेच; कारण आलं समोर

पुणे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती.

गोपाल मोटघरे

पुणे : दिवाळीनिमित्त (Diwali) काल राज्याभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली होती. याच गर्दीमुळे पुण्यातील (Pune) रेल्वे स्टेशनवर (Railway station platform) चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती.

मात्र, साजन बलदेवन याचा मृत्यू चेंगराचेंगरीत मृत्यु झाला नसून, दम्याच्या आजारामुळे सदर प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने (Pune Railway Division) केला आहे. साजन बलदेवन हा काल पुणे दानापूर एक्सप्रेसने (Pune Danapur Express) प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बिहारला जाणार होता.

मात्र, बिहारला (Bihar) जात असताना त्याची प्रकृती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच अतिशय खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन सोबत असलेल्या त्याच्या इतर सहकारी मित्रांनी देखील त्याला दम्याचा आजार असल्यास पोलीस पुणे रेल्वे पोलीस विभागाला कळवल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT