धक्कादायक|'इंस्टाग्राम'द्वारे झालेल्या ओळखीचा घेतला गैरफायदा; जिच्याशी ओळखं तीचंच केलं अपहरण
धक्कादायक|'इंस्टाग्राम'द्वारे झालेल्या ओळखीचा घेतला गैरफायदा; जिच्याशी ओळखं तीचंच केलं अपहरण प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

धक्कादायक|'इंस्टाग्राम'द्वारे झालेल्या ओळखीचा घेतला गैरफायदा; जिच्याशी ओळखं तीचंच केलं अपहरण

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली Dombivli अल्पवयीन मुलीवर अत्याचारांची घटना ताजी असतानाच त्याच डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी Vishnunagar Police लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. इंस्टाग्रामच्या Instagram माध्यमातून जवळीक साधत एका 13 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्याला आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडवत मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे. अक्षय तुकाराम महाडिक (21) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (The 13-year-old girl was abducted)

हे देखील पहा -

आरोपीला ठाण्यातून अटक सोमवारी 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास विष्णूनगर पोलीस ठाण्यात कलम 363, 354 सह लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याचे सन 2012 चे कलम 12 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका 13 वर्षीय मुलीला फूस लावून तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होताच डोंबिवली पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडवून आणले. खासगी गुप्तहेरांच्या साह्याने अक्षय महाडिक याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला चार दिवस ठेवले घरात कोंडून आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने या मुलीला भिवंडीतील Bhivandi एका घरात कोंडून ठेवल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी भिवंडीतील काल्हेर गावातल्या तेजस्विनी आर्केड इमारतीतल्या Tejaswini Arcade building आरोपीच्या फ्लॅटमध्ये कोंडलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलीला तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आल्याचे पंढरीनाथ भालेराव या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सदर प्रकरणातील13 वर्षीय तक्रारदार मुलीशी आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातून या मुलीशी जवळीक साधल्यानंतर आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. आरोपी अक्षय महाडिक हा सीसीटीव्ही सिस्टीम, कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असल्याने तो सोशल मिडिया माध्यमांमध्येही तरबेज आहे. त्यामुळेच त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीशी जवळीक साधली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

तर दुसरीकडे डोंबिवलीच्या टिळकनगर TilakNagar हद्दीत कचोरे गावातील 15 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला आहे. शिकवणीला येणाऱ्या मुलीला सोडायला गेली असता मुलीच्या बापाने जबरदस्ती करत मुलीला क्लासमध्ये पाठी का बसवते, घाणीत का बसवते असे बोलत 15 वर्षीय मुलीला पकडले, मुलीने आरडाओरडा करताच आरोपी पप्पू सहानी (वय 25) पळून गेला.मात्र मध्यरात्री टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Edited By - Jagdish patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

SCROLL FOR NEXT