Raj Thackeray-Eknath SHinde Saam tv
मुंबई/पुणे

Thane Politics : ठाण्यात शिवसेना शिंदे गटाला मनसेचा जोरदार धक्का!; भिवंडीतील पदाधिकारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत करणार प्रवेश

Shivsena-MNS Thane Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे. संतोष शिंदे हे शहापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष होते.

प्रविण वाकचौरे

Thane News :

लोकसभा निवडणूक तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहे.

शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहर प्रमुख महिला आघाडी, तालुका प्रमुख महिला आघाडी व शहापूरमधील इतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे. संतोष शिंदे हे शहापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष होते. त्यामुळे येत्या काळात शहापूर तालुक्यात मनसेची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. Latest Marathi News)

संतोष शिंदे यांचा राजकीय प्रवास

शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी मनसे पक्षाची स्थापना केली, त्यावेळी संतोष शिंदे हे मनसेचे शहापूर प्रमुख होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर ते उद्धव ठाकरे गटात गेले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हा ते शिंदे गटाचे ठाणे जिल्हा उपसंपर्क प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यानंतर आज त्यांनी मुंबई येथे जाऊन मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT