Thane Police  SaamTV
मुंबई/पुणे

Thane Police : जितेंद्र आव्हाड यांना अटक करणाऱ्या पोलीस उपायुक्तांची बदली

विनयकुमार राठोड हे देखील या कारवाईत सामील होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : ठाणे पोलीस (Thane Police) दलातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. उपायुक्त विनयकुमार राठोड यांचा देखील यात समावेश आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेच्या कारवाई दरम्यान ही बदली झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली होती. विनयकुमार राठोड हे देखील या कारवाईत सामील होते.

जितेंद्र आव्हाड यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी मी पोलिसांना दोष देणार नाही असं म्हटलं आहे. तसेच पोलिसांवर दबाव असल्याचं म्हटलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी डीसीपी विनयकुमार यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. मात्र ते हतबल असल्याचं आव्हाडांनी म्हटलं होतं. मात्र या दरम्यान राठोड यांची बदली झाल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. (Latest News Update)

विनयकुमार राठोड यांची परिमंडळ 5 मधून वाहतूक शाखेत बदली झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांची बढती झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठाण्यासाठी ट्रॅफिक हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती नाही ठाण्यातील वाहतूक शाखेतील पोस्ट किती महत्वाची आहे. त्यांना बक्षीस मिळालं आहे असं समजा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

तीन उपायुक्तांच्या बदल्या

  1. उपायुक्त विनयकुमार राठोड यांची परिमंडळ 5मधून शहर वाहतूक शाखेत बदली.

  2. उपायुक्त सुधाकर पठारे यांची विशेष शाखेतून परिमंडळ 4 येथे बदली.

  3. उपायुक्त गणेश गावडे यांची मुख्यालय-2 येथून परिमंडळ 1 ठाणे येथे बदली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT