Thane Bhiwandi Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Thane Crime : विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवत शिक्षकाचं भयानक कृत्य; ठाण्यातील संतापजनक घटना

Thane Bhiwandi Crime News : आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला शाळेतील एका शिक्षकाने मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ दाखवले. इतकंच नाही, तर तिच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्ष देखील केले.

Satish Daud

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलंय. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर नंदुरबार येथील एका सफाई कर्मचाऱ्याने शाळकरी मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले. आता ठाण्यातही असाच काहीसा प्रकार घडलाय.

आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला शाळेतील एका शिक्षकाने मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ (Crime News) दाखवले. इतकंच नाही, तर तिच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्ष देखील केले. घडलेला सर्व प्रकार पीडितेने आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी भिवंडी येथील रहिवासी असून ती एका नामांकित शाळेत शिकते. आरोपी शिक्षक देखील याच शाळेत शिकवणीला आहे. बुधवारी पीडित विद्यार्थिनी शाळेत उशिरा आली होती. त्यामुळे मुख्याद्यापकाने तिला खडसावले.

तसेच तिच्या वडिलांना शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत काहीही सांगितले नाही. मात्र, जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. शाळेतील शिक्षक मला मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ दाखवतो. तसेच नको त्या जागी स्पर्ष करतो, अशी तक्रार विद्यार्थिनीने केली.

तसेच तिच्या वडिलांना शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत काहीही सांगितले नाही. मात्र, जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. शाळेतील शिक्षक मला मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ दाखवतो. तसेच नको त्या जागी स्पर्ष करतो, अशी तक्रार विद्यार्थिनीने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT