Thane mumbra bypass Accident CCTV Footage:  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbra Accident Video: मुंब्रा बायपासवर भयंकर अपघात! ट्रकचा टायर फुटून टेम्पोला धडक, एकाचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Thane mumbra bypass Accident CCTV Footage: ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर आज ट्रक आणि टेम्पोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

विकास काटे, मुंबई| ता. २५ मे २०२४

पुणे शहरातील हिट अँड रन केस प्रकरण सध्या चर्चेत आहे. या भयंकर अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशातच ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर आज ट्रक आणि टेम्पोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. पुणे शहरातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अशातच आज मुंब्रा बायपासवर एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून या भयंकर दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. या थरारक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ब्रीजवर चाललेल्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकला टेम्पोने जोराची धडक दिली. या धडकेने ट्रक थेट बायपासवरुन खाली कोसळला. यावेळी खाली चाललेला दुचाकीस्वार त्याखाली चिरडला गेला. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर दुर्घटनास्थळी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बीडमधून एक भीषण अपघाताची घटनासमोर आली आहे. बीडच्या माजलगाव शहरामध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या झालेल्या अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी झाला आहे तर 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. माजलगाव शहरातील मोंढा परिसरात असणाऱ्या पाण्याच्या कॅनल जवळ ही घटना घडली. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar : 2029 मध्ये वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं, जय पवार यांचं सुनेत्रा पवारांबद्दल मोठं विधान, VIDEO

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Dhule Tourism: लोणावळा-खंडाळा विसरा! धुळ्याजवळच्या 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की फिरून या

Maharashtra News Live Update: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Benefits of Cinnamon Tea: वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर प्या ही खास चहा, मिळतील हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT