Kunal Patil, Kalyan News 
मुंबई/पुणे

Kalyan Shiv Sena : 'उद्याच २५ लाख दे, नाहीतर...' शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाणे जिल्ह्यात पुन्हा खळबळ

Kunal Patil, Kalyan News : कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांना परदेशातून फोन करून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या फोनवरून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही सांगण्यात येत असून मानपाडा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

Kunal Patil death threat Kalyan latest news : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांना परदेशातून आलेल्या एका फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचाही आरोप आहे. या घटनेमुळे कल्याणच्या राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

कुणाल पाटील यांना आलेल्या या आंतरराष्ट्रीय फोन कॉलवरून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या फोन कॉलची एक ऑडिओ क्लिपदेखील समोर आली असून, त्यामध्ये २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

या प्रकरणात 'एच. पी. पुजारी' उर्फ 'अण्णा' नावाच्या एका गँगस्टरचा उल्लेख केला जात आहे. मात्र, या दाव्याची आणि आरोपांची अधिकृत माहिती पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक कुणाल पाटील यांनी याप्रकरणी कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलीस धमकीच्या कॉलचा मूळ स्रोत, संबंधित व्यक्ती आणि खंडणीमागचे कारण यांचा सखोल तपास करत आहेत.

एका लोकप्रतिनिधीलाच कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय व सामाजिक वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या धमकीमागे नेमका कोणाचा हात आहे आणि २५ लाखांची खंडणी का मागण्यात आली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार की नाही? हिटमॅनने स्पष्टच सांगून टाकलं,गिलच्या कॅप्टनशीपवरही भाष्य

जनावरं जगवता येईना, बाजारात भाव मिळेना, चारा-पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांचे हाल

समुद्रकिनारी आढळला पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह; मुंबईत खळबळ

Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

CNG Price : गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामन्यांना झटका

SCROLL FOR NEXT