Thane Joshi Bedekar Collage Students Beaten SAAM TV
मुंबई/पुणे

Joshi Bedekar College: ठाण्यात जोशी-बेडेकर कॉलेजच्या NCC विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, पोलिसांकडून चौकशी

Thane Joshi Bedekar Collage Students Beaten : ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगदरम्यान झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

Nandkumar Joshi

विकास काटे, ठाणे

Thane Joshi Bedekar Collage Students Beaten : ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगदरम्यान झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. साम टीव्हीनं यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन चौकशी सुरू केली आहे.

ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान सीनीअर कॅडेट कॅप्टनने काठीने अमानुष मारहाण केली होती. या विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमध्येच पाण्यात ट्रेनिंग दिलं जात होते. त्याचवेळी या कॅप्टनकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसारित केलं होतं. साम टीव्हीनंही ही बातमी दाखवली होती. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. (Latest News Update)

या घटनेनंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. ठाण्यातील (Thane) हे प्रतिथयश कॉलेज असून, असले प्रकार कॉलेजच्या व्यवस्थापनातील वरिष्ठांच्या लक्षात कसे आले नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ठाणे नगर पोलीस थेट कॉलेजमध्ये चौकशीसाठी पोहोचले. त्यांनी या प्रकरणी तात्काळ चौकशी सुरू केली.

दुसरीकडे यासंदर्भात तक्रार करण्यासाठी कोणताही विद्यार्थी पुढे आला नाही. त्यामुळे पोलिसांनी कॉलेजच्या (Collage Student) वरिष्ठांशी आणि व्यवस्थापनाकडे चौकशी सुरू केली आहे, असे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत कॉलेजच्या वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे कुणाशीही बोलणे होऊ शकले नाही. मनसेने या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा कॉलेज व्यवस्थापनाला दिला आहे.

रोहित पवार संतापले

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. एनसीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअरकडून अमानुष मारहाण झाल्याची ही बातमी धक्कादायक आहे. अशी मारहाण हा प्रशिक्षणचा भाग आहे का? आणि नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच विद्यार्थ्यांना अतिरेक्यांप्रमाणे झालेल्या मारहाणीच्या या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT