Thane Fire News Saam
मुंबई/पुणे

Thane Market Fire: भल्या पहाटे ठाण्यात अग्नितांडव! ठाणे रेल्वे स्टेशनजवळ भीषण आग, गावदेवी भाजी मार्केट खाक

Thane Fire News : ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागून अनेक दुकाने आणि गाळे जळून खाक झाले. ठाणे रेल्वे स्टेशनजवळील या घटनेत मोठे नुकसान झाले.

Namdeo Kumbhar

Gaodevi vegetable market Fire : ठाण्यातील प्रसिद्ध गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मार्केटमधील दुकाने आणि भाजीचे गाळे जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले.

ही आग पहाटेच्या सुमारास लागल्यामुळे मार्केटमध्ये लोकांची गर्दी नव्हती. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. गावदेवी भाजी मार्केटला ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT