Mumbra Breaking News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbra Breaking News: CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, दोन्ही गट आमने सामने; मुंब्र्यात काय घडतयं?

Uddhav Thackeray News: या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत,

Gangappa Pujari

Uddhav Thackeray Mumbra Visit Update:

मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवरुन शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आलेत, ज्यामुळे ठाण्यामध्ये हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते नरेश मस्केही कार्यकर्त्यांसह दाखल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला असूनन पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

मुंब्र्यातील (Mumbra) एका शाखेमुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा पाहायला मिळत आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

मात्र शिंदे गटाचेही कार्यकर्ते या परिसरात दाखल झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांकडूनही उद्धव ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. मात्र शाखेला भेट देण्यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी चर्चा केली. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे न जाण्याची विनंती केल्याने उद्धव ठाकरे पुन्हा गाडीत बसले.

दरम्यान, उद्धव ठाकरे मुंब्र्यात आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी उद्धव ठाकरे चले जावच्या घोषणाही देण्यात आल्या. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

SCROLL FOR NEXT