Eknath Shinde Latest News, Aditya Thackeray News, Shiv Sena News Today, Latest Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray News: राज्यात गुंडागर्दी सुरू, गृहखाते ठाण्यातून चालते का? आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना खोचक सवाल

Maharashtra Politics: स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना जर गृहमंत्री प्रोटेक्त करत नसतील तर चाललंय काय?? अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

Gangappa Pujari

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी...

Mumbai News: शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आदित्य ठाकरेंचे मित्र साईनाथ दुर्गे यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची सुटका झाली. आज शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी साईनाथ दुर्गे यांच्या घरी जावून भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी राज्यामध्ये गुंडगिरी वाढत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

साईनाथ दुर्गे यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यामध्ये गुंडागर्दी वाढत असून गृहखाते ठाण्यातून चालते का? असा सवाल यावेळी उपस्थित केला. आमचा वाघ साईनाथ इथं आहे, त्याला अटकेत घ्यायचा म्हणून घेतलं. काल युवती सेनेच्या महिलेला पोस्ट केली म्हणून मारहाण करण्यात आली. या अगोदर एका कार्यकर्त्यांला मारलं, यामध्ये गुन्हा कोणाचा? लोकांना मारहाण होतेय यावर कारवाई होत नाही, स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना जर गृहमंत्री प्रोटेक्त करत नसतील तर चाललंय काय?? अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

राज्यात अंधाधुंद कारभार सुरू....

आत्ता राज्यात सगळा अंधाधुंद कारभार चालला आहे हेच दिसतं आहे. हे सगळं चाललेलं असताना पडद्याआड दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल तर मुंबई महापालिकेत (BMC) अनेक भ्रष्टाचार समोर येत आहेत. अशा किती महापालिका असतील? निवडणुका न होऊ देणं, आता एक वर्ष होऊन गेलं तरीही निवडणुका घेतल्या गेलेल्या नाहीत. महापालिकेत मुंबईकरांचा पैसा कुठे जातो आहे? याचा विचार होण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT