Shivsena  Saam TV
मुंबई/पुणे

Political News: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; पक्षबांधणी आणि प्रशासकीय कामातील हुकमी एक्का शिंदेंच्या शिवसेनेत

मारूती साळुंखे हे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या जवळचे मानले जातात.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात शह-काटशहचे राजकारण सध्या सुरु आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचं शिंदे गटात इनकमिंग अद्यापही सुरुच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे व प्रशासकिय कामातील माहितगार मारूती साळुंखेंनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मारूती साळुंखे हे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेना संघटना बांधण्यात व प्रशासकिय कामात मारूती साळुंखे यांचा महत्वाचा वाटा असल्याचे बोलले जाते. (Latest Marathi News)

मारूती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्ष बांधणीच्या कामात बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावेळी बोलून दाखवला. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे व माजी नगरसेविका शितल म्हात्रे या उपस्थित होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT