Tukaram Supe: TET पेपर गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपे कोरोनाबाधित Saam TV
मुंबई/पुणे

Tukaram Supe: TET पेपर गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपे कोरोनाबाधित

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहारात अटकेत असलेले आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Scam) गैरव्यवहारात अटकेत असलेले आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. सुपे यांना उपचारांसाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात यावे असा अर्ज सुपे यांच्या वकिलांकडून शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

तुकाराम सुपे (Tukaram Supe) कोरोनाबाधित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले असून त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात यावे. उपचाराचा खर्च सुपे करण्यास तयार आहेत, असा अर्ज सुपे यांचे वकीलांनी न्यायालयात सादर केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी अर्ज दाखल करून घेतला आहे. या अर्जावर सरकार पक्ष तसेच तपासी अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT