TET परीक्षा घोटाळा SaamTV
मुंबई/पुणे

TET Exam Scam | TET परीक्षा घोटाळा, शिक्षण विभागाकडून चौकशी समितीची स्थापना

टीईटी परीक्षेतील घोटाळ्यासंबंधी (TET Exam Scam) आता शिक्षण विभागाने चौकशी सुरु केलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई : टीईटी परीक्षेतील घोटाळ्यासंबंधी (TET Exam Scam) आता शिक्षण विभागाने चौकशी सुरु केलीये. शिक्षण विभागाकडून चौकशीसाठी समिती (Inquiry Committee) नेमण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना पुणे पोलिसांनी अटक केलीये. - TET Exam Scam education department establish inquiry committee

चौकशीसाठी समिती नेमणूक

शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदन कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा (TET Exam) घोट्याळाप्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर शिक्षण विभागाने स्थापन समिती केलीये.

गंभीर बाब म्हणजे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा या संपूर्ण टीईटी परीक्षा घोटाळ्यात सहभाग असल्याचं पुढे आलं आहे. त्यानंतर ही समिती नेमण्यात आली आहे. परीक्षा झाली आता काही दिवसात या परीक्षेचा निर्णय येणार होता. मात्र, त्यापूर्वीच हा सर्व भांडाफोड झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आणि सरकार यावर आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.

शिक्षण विभागातील अधिकारी या घोटाळ्यात सहभागी असल्याने आथा या परीक्षांबाबत काय करायचं, याचाच निर्णय घेण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. नेमकं टीईटी परीक्षेत किती गोष्टींवर परीणाम झालाय, काय निर्णय घ्यावा लागेल, हे ही समिती ठरवणार आहे. तर, पोलिसांचा तपासही सुरु राहणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT