Accident : माळशेज घाटात अपघात; कार दरीत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : माळशेज घाटात अपघात; कार दरीत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

कार दरीत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : कल्याण- नगर महामार्गावर माळशेज घाटामध्ये Malshej ghat एका कारचा भीषण अपघात accident झाला आहे. चालकाचे कारवर असलेले नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये एक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील अन्य ६ जण गंभीर जखमी injured झाले आहेत. कार दरीत कोसळल्यावर कारने पेट घेतल्याचे देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

मोरोशी या ठिकाणी भैरवगडावर ट्रेकिंगकरिता आलेल्या काही औरंगाबादच्या तरुणांनी जखमींना बाहेर काढले आहे. या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना देण्यात आली आहे. संबंधित दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या ५५ वर्षीय महिलेचे नाव सखुबाई उगले असे आहे. तर उषा सूर्यकांत कोकणे, उर्मिला चंद्रकांत लागे, पांडुरंग नामदेव मिलखे, सोनाली गणेश काटे, ऋषीकेश सूर्यकांत कोकणे आणि चालक आकाश शंकर गेगजे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

संबंधित सर्व जखमींना उल्हासनगर या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे. अपघातग्रस्त कारमधील सर्वजण कल्याणहून माळशेज घाटमार्गे वाडा या ठिकाणी जात असताना हा अपघात घडला आहे. संबंधित सर्वजण इको कारने जात होते. दरम्यान माळशेज घाटातून जात असताना लाजवंती पॉईंट जवळ कारचालकाचे अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि काही कळायच्या आत कार दरीत कोसळली आहे.

दरीत कोसळल्यानंतर कारने अचानक पेट देखील घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. हा अपघात आज पहाटे साडे ३ च्या सुमारास घडला आहे. हा अपघात घडताच मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगकरिता जाणाऱ्या औरंगाबाद येथील ट्रेकर्संनी घटनास्थळी वेळीच धाव घेतली आहे. आणि तातडीने मदत कार्य सुरू केले होते. यामुळे कारमधील अन्य ६ जणांचे जीव वाचले आहेत. संबंधित सर्वांना उल्हासनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT