ten out of ten marks given to budget by pravin darekar Saam Tv
मुंबई/पुणे

Union Budget 2022 Reactions: "अर्थसंकल्पाला दहा पैकी दहा गुण" - प्रवीण दरेकर

Union Budget 2022 Reactions: सरकारच्या अर्थसंकल्पाचं भाजप नेते भरभरुन कौतुक करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनीही बजेटबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प २०२२-२३ (Union Budget 2022) मांडला. यावेळी त्यांनी भारतात डिजिटल करन्सीसह (Digital Currency) अनेक नव्या घोषणा केल्या. सरकारच्या अर्थसंकल्पाचं भाजप नेते भरभरुन कौतुक करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनीही बजेटबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अर्थसंकल्पाला दहा पैकी दहा गुण दिले आहेत. ("Ten out of ten points to the budget" said Praveen Darekar)

हे देखील पहा -

बजेट बद्दल प्रविण दरेकर म्हणाले की, देशातील प्रत्येक घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडला गेला असून हा एक ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडला गेला आहे. पुढील पंचवीस वर्षांचे व्हिजन या अर्थसंकल्पात दिसते असंही दरेकर म्हणाले. तसेच महिला, शेतकरी, युवक यांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतुन १६ लाख नोकऱ्या देणार आहे. गती-शक्ती योजनेतून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळणार आहेत. जनधन योजनेचा सर्वसामान्यांना मोठा फायदा झाला असंही दरेकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, सरकार पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी तरतूद केली आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असला तरी अर्थव्यवस्था हळूहळू सावरते आहे, हे बजेट मधून दिसून येते. कॉर्पोरेट टॅक्स कमी करत दिलासा दिला गेला आहे, सहकार क्षेत्रात दिलासा दिला आहे. जे लोकांच्या मनात आहे ते बजेटमध्ये आहे असं म्हणत या बजेटमुळे देशाच्या आर्थिक विकासात भर पडेल आणि यातून उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होईल असंही दरेकर म्हणालेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: भाजप सर्वात मोठा पक्ष, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

SCROLL FOR NEXT