Aditya Thackeray and Eknath Shinde clash over temple donation theft allegations, sparking political controversy in Maharashtra saam tv
मुंबई/पुणे

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

Siddhivinayak vs Ram Temple Row: राममंदिरातील दानचोरीवर सत्ताधाऱ्यांना घेरणाऱ्या ठाकरेंची शिंदेंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. देवाच्या दानचोरीवरुन राज्यात कसं शह-कटशहाचं राजकारण रंगलंय. पाहा....

Snehil Shivaji

राम मंदिराच्या दान चोरीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा अधिवेशनातला हा रुद्रावतार.. भाजपच्या आमदारांना थेट दानचोर म्हणत अंगावर धावून जाणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या या उग्र रूपाने राजकीय वर्तुळासह सोशल मीडिया गाजवला. पण हा वार जिव्हारी लागताच, ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा पलटवार केला. विरोधकांची कोंडी करण्यासाठी शिंदेंनी थेट साडेतीन वर्षांपूर्वीच्या सिद्धीविनायक मंदिरातील कथित अपहाराचं भूत बाहेर बाहेर काढलं. शिंदेंच्या या एकाच चालीने एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आता रंगू लागलीये.

उपमुख्यमंत्री शिंदेंनी सिद्धीविनायक मंदिरातील अपहाराचा जो मुद्दा उपस्थित केला तो मूळचा मनसेच्या यशवंत किल्लेदारांचा होता. त्यावेळी किल्लेदारांनी थेट पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. काय होते ते आरोप? पाहा..

न्यासाच्या घटनेत तरतूद नसतांना शिवभोजन थाळीसाठी 5 कोटींचे अर्थसहाय्य

कोरोना काळात प्लाझ्मा दान मोहिमेत निधीचा गैरवापर

सिद्धीविनायक मंदिरातील नोकरभरतीत भ्रष्टाचार

मंदिरातील टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव

मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी थेट आदेश बांदेकर आणि तत्कालीन कार्यकारी सदस्यांविरोधात थेट पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनात चौकशी करून कारवाईचं आश्वासनही दिलं होतं. मग तरीही साडेतीन वर्ष ही कारवाई का रेंगाळली? असा सवाल आता उपस्थित होतोय. तर दुसरीकडे, आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या या आरोपांची हवा काढत त्यांच्यावरच उलटवार केलाय.

तीन महिन्यांपूर्वीच सिद्धीविनायक मंदिरात एका कर्मचाऱ्याला दानचोरी करताना रंगेहात पकडलं गेलं, एफआयआर झाला, अटकही झाली. मंदिर न्यासानं दिलेल्या पुराव्यांवरच पोलिसांनी ही कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असताना... आता केवळ राम मंदिरातील चोरीविरोधात बोलणाऱ्या विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठीच, तीन वर्षांपूर्वीच्या अपहाराचा हा जुना मुद्दा उकरून काढला जातोय का? कारण, ठाकरेंनी भाजपवर दानचोरीचे आरोप करताच, शिंदेंनी थेट सिद्धीविनायकाचा मुद्दा काढला. या एकाच खेळीने शिंदेंनी ठाकरेंना तर कोंडीत पकडलंच, शिवाय भाजपच्या दिल्लीश्वरांना खुश करत राज्यातील भाजपच्या नेतृत्वाचीही कोंडी केली का? अशी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालीये. शह-काटशहच्या या राजकारणात दानचोर सुटता कामा नये इतकंच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

Famous Singer Death: भारतीय संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; ज्येष्ठ गायिका काळाच्या पडद्याआड

रस्त्यावर हजारो विषारी साप, पुराच्या पाण्यात सापांचा सुळसुळाट

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

SCROLL FOR NEXT