Tejas Thackeary Saam Tv
मुंबई/पुणे

मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर तेजस ठाकरेंकडून शिवसैनिकांची विचारपूस

मुंबईत राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा हायव्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या कारवर 'मातोश्री' परिसरात कलानगरच्या सिग्नलवर जमावानं हल्ला केल्याची घटना रात्री घडली. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी मोकळेपणाने संवाद साधला.

हे देखील पहा -

ठाकरे कुटुंबातील व्यक्तींची भेट ही शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारी ठरू शकते. काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसैनिकांशी संवाद साधला होता. या सगळ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवी उर्जा आली आहे.

मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री मातोश्रीबाहेर कलानगरच्या सिग्नलवर हल्ला झाला. त्यानंतर एकच गोंधळ झाला. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिल्यानंतर राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर कंबोज यांच्याकडून मातोश्रीची रेकी केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्याने आज सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहोचू, असे सांगितले आहे. त्यामुळे आज मुंबईत राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा हायव्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

Kalyan: अधिकाऱ्यांना मारले, आता ते आम्हाला पण मारतील; फेरिवाल्यांविरोधात कारवाई करा, शिंदेंचे नगरसेवक आक्रमक

SCROLL FOR NEXT